बारामती(वार्ताहर): येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने व मे.चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्या प्रायोजनाखाली गुरूवार दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वा. ज्येष्ठ नागरिक संघ याठिकाणी अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी देशाचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना, ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन 1947 साली जन्मलेल्या व वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि.चे चेअरमन किशोर शहा हे उपस्थित राहणार असुन, नगरपरिषदेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास संघाचे सदस्य व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माधव जोशी यांनी केले आहे.