बारामती(वार्ताहर): सामाजिक क्षेत्रात काम करणारे, रस्त्यावर अपघात झाल्यावर त्यास तत्पर सेवा देणारे, नागरीकांच्या मुलभूत गरजा मिळण्यासाठी शासन, प्रशासनाला दोन हात करून भांडणारे वस्ताद अस्लम शेख यांनाच राहत्या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणजे जातीवादाच्या झळा सोसाव्या लागल्या ही खूप मोठी शोकांतिका आहे.
वस्ताद अस्लम शेख चव्हाण युको पार्क, जळोची याठिकाणी राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. चहाच्या व्यवसायावर या पार्कमध्ये फ्लॅट घेतला. मुलीचे लग्न ठरले, कार्यालयाचा खर्च परवडत नसल्याने कमी खर्चात लग्न व्हावे म्हणून त्यांनी चव्हाण युको पार्कमध्ये लग्न करण्याचे ठरविले. मात्र, त्यांना याठिकाणी लग्न करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे अस्लम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शुभकार्यात विघ्न नको म्हणून लग्नानंतर संबंधितावर कार्यवाही होणेसाठी योग्य त्या ठिकाणी अर्ज करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.