बारामती (वार्ताहर): सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही महिलांना वाचण्यापेक्षा शर्मिलावहिनींना वाचा त्यात नक्की यश आल्याशिवाय राहणार नाही असा विश्र्वास माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
पुणे व सातारा जिल्ह्यात जलसंधरणासह वृक्षसंवर्धन, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शरयु फौंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना अनंतराव पवार सामाजिक पुरस्कार-2022 कार्यक्रम प्रसंगी आ.भरणे बोलत होते.
यावेळी सह्याद्री फार्म्सचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार, शरयु उद्योग समुहाचे श्रीनिवासबापू पवार, विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वस्त ऍड.ए.व्ही.प्रभुणे, शरयु ऍग्रोचे सीईओ युगेंद्र पवार, आ.अशोक पवार, आ.यशवंत माने, माजी आ.रमेश थोरात, शिवाजीराव काळे, दिलीप तावरे, पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.भरणे म्हणाले की, शरयु फौंडेशनने समाजातील दुर्लक्षित गरीब माणसांना पुरस्कार दिला आहे. ही माणसे कधीही विसरू शकणार नाही. पुरस्कार दिलेल्या चेहर्याकडे पाहिल्यानंतर श्रीनिवास पवार, शर्मिला पवार व शरयु फौंडेशनचे आभार मानावे तेवढे कमी आहे असेही ते म्हणाले.
शरयु फौंडेशनच्या माध्यमातून गरीबांसाठी हृदयस्पर्शी काम केलेले आहे. आर्थिक परिस्थिती दुर्बल असणार्या शेतकर्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत दीड हजार विहीरी खोदून देण्याचे काम केले. यामुळे गरीब कुटुंबियांच्या प्रपंचाला हातभार लागला, त्याचा आशिर्वाद शरयुला लागला. याबरोबर 250 पेक्षा जास्त ओढे, नाले, बंधारे खोलीकरण करण्यात आले. यामुळे त्या शेतकर्याला पीक घेता आले, आर्थिक उत्पन्न वाढले यामुळे त्यांच्या गरजा भागल्या व शेती फुलू लागली एवढं मोठं काम शरयु फौंडेशनच्या माध्यमातून झाले आहे.
आरोग्य शिबीर, पालखीत वारकर्यांना छत्री, शाली वाटप करून सामाजिक भान जपण्याचे काम केले आहे. शरयु फौंडेशन सामाजिक काम करताना कधीही राजकारण आणले नाही. सर्वांना मदत व सहकार्य करता येईल हे पाहिले. कित्येक गोर-गरीबांना घरे बांधून दिले. शर्मिलावहिनी व श्रीनिवास बापू यांनी भरणेवाडीतील एका कुटुंबाला खुप मोठी मदत केली आहे. पवार कुटुंबियांनी केलेली मदत कधीही जाहीर केली नाही ही खुप मोठी अभिमानास्पद बाब असल्याचेही भरणे यांनी यावेळी सांगितले.
शर्मिलावहिनी प्रत्येकाच्या सुख-दु:खात हजेरी लावतात त्यांची विचारपुस करतात. गोर-गरीबांच्या झोपडीत जावुन त्यांची आपुलकीने विचारपुस करतात यामधुन त्यांनी माणसं जोडलेली आहे. गरीबांना आनंद देऊन, दहापट आनंद शरयु फौंडेशन घेत असल्याचेही आ.भरणे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेचे युग आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुढच्या माणसाला माफ करण्याचे शिका जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असाही मुलमंत्र यावेळी त्यांनी दिला.
सह्याद्री फार्मच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी खुप मोठे काम विलास शिंदे यांनी उभे केले आहे. त्यांच्या कामाची नोंद सर्वत्र घेतली जाते. शेवटी त्यांनी अनंतराव पवार (तात्यासाहेब) यांच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला.
गेल्या काही वर्षात शरयु फौंडेशनने विविध क्षेत्रात पथदर्शी काम करत एक वेगळा नावलौकीक प्राप्त केला आहे. हे कार्य करीत असताना समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्या अनेक संस्थांचाही हातभार लागत असतो. त्यामुळे अशा संस्थांचे कार्य समाजासमोर यावे या हेतूने शरयु फौंडेशनच्या वतीने अनंतराव पवार सामाजिक पुरस्कार देण्यात येतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकशरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला पवार यांनी केले. यावेळी त्यांनी फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशांक मोहिते यांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या मनोरंजन कार्यक्रमाचे बहारदार सादीकरण करण्यात आले. अबाल,वृद्धांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. यावेळी गदिमा सभागृह गर्दीने ओसंडून वाहत होते.
उद्याची आशा…युगेंद्रदादा….!
युगेंद्रदादा यांचेकडे पाहुन उद्याची आशा वाटते तुमच्याकडून खुप मोठे काम व्हावे. श्रीनिवासबापू व शर्मिलावहिनी यांनी गरीबांच्या उद्धार, उत्कर्षासाठी काम केले. त्यांच्या सुख-दु:खात जावुन माणसं जोडत गेली. तशीच अपेक्षा युगेंद्रदादांकडून आहे. – मा.राज्यमंत्री, आ.दत्तात्रय भरणे
1992 साली माझे राजकारण सुरू झाले. आज माझ्या राजकीय व सामाजिक यशामध्ये श्रीनिवासबापू व शर्मिलावहिनी यांचा खुप मोठा वाटा आहे. माझ्यासाठी त्यांची खुप कष्ट घेतले. सुखात सगळे असतात, दु:खाच्या व अडचणीच्या काळात या दोघा उभयतांनी खुप मोठे सहकार्य व मदत केली हे कदापिही विसरता कामा नये. – मा.राज्यमंत्री, आ.दत्तात्रय भरणे
पुरस्काराचे मानकरी….
पद्मश्री राहीबाई पोपेरे, हरिचंद्र सुडे, कमल परदेशी, बारामती नगरपरिषदेचे सलीम शेख, राजेश लोहाट, कल्याणी भारंबे, नममिा कपाळे यांना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनंतराव पवार सामाजिक पुरस्कार-2022 करण्यात आला.