अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): श्री क्षेत्र तुळजापूर येथून ज्योत घेऊन येणार्या भाविकांचे इंदापूर येथे राधिका सेवा संस्थान इंदापूर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच देवी भक्तांना खिचडी व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
या वेळी राधिका सेवा संस्थांचे सर्वेसर्वा इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ, इंदापूर नगरपालिकेचे गटनेते गजानन गवळी, नगरसेवक अमर गाडे,अनिकेत वाघ,अतुल शेटे पाटील,विकास खिलारे,धरमचंद लोढा, श्रीकांत मखरे, नितीन सोनटक्के,सुरज बंगाळे,हनुमंत जाधव,राधिका मुख्याध्यापक दत्तात्रेय दडस, दादासाहेब झोळ व सर्व शिक्षक वृंद यांनी भाविकांचे स्वागत केले. या वर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने आदिशक्ती राधिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महोत्सवात भव्य प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे दांडिया स्पर्धा नवदुर्गांचा सन्मान अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत अशी माहिती नगरसेवक अनिकेत वाघ यांनी दिली आहे.