निरा भिमा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन उत्साहात!

अशोक घोडके यांजकडून…

इंदापूर(प्रतिनिधी): शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 च्या 22 व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदिपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.26) उत्साही वातावरणात संपन्न झाला.

आगामी गळीत हंगामामध्ये 8 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच आगामी हंगामात इथेनॉलचे 1 कोटी 65 लि. उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4 कोटी युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक मच्छिंद्र वीर व शालनताई वीर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील, अधिकारी, हितचिंतक उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन तर सुधीर गेंगे-पाटील यांनी आभार मानले.05:15 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!