अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर(प्रतिनिधी): देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार व निमगाव केतकी येथील ज.मा.मोरे यांचे असणारे मैत्रिचे घनिष्ठ संबंध उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यानिमित्ताने मोरे कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली.
कुर्डूवाडी (ता.माढा) येथील स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावर करण्यासाठी मार्गस्थ होत असताना श्री.पवार यांनी मोरे कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष समीर मोरे यांनी पवार साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भारत मोरे यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. ज.मा.मोरे यांच्या निधनानंतर श्री.पवार यांनी मोरे कुटुंबाचे स्वत: येऊन सांत्वन देखील केले होते त्यानंतर ही भेट दिली. त्यामुळे पवार आणि मोरे कुटुंबीयांचे असणारे नाते अतुट आहे हे यावरून दिसून येते.
यावेळी निमगाव केतकी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.