अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): अस्तरीकरणासाठी शेतकर्यांनी पेटून उठले पाहिजे असे परखड मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग रायते यांनी मांडले.
गोतंडी येथे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन कुतमिरे उपस्थित होते. यावेळी गोतंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, माजी चेअरमन आप्पा पाटील, पापस साहेब, अरुण नलवडे, मारुती नलवडे, अंकुश आबा माने, आबा मार्कड, गुरुनाथ पाटील, अनिल खराडे, रवी कांबळे व सर्व शेतकरी उपस्थित होते.
गोतंडी गावातील शेतकर्यांनी अध्यक्ष रायते यांच्याकडे आपल्या तक्रारी मांडल्या. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण सुरू झाल्यास हे काम होऊ देणार नाही बळजबरीने काम सरकारने करण्याचा प्रयत्न केल्यास याच निरा-डावा कालव्यामध्ये जलसमाधी घेण्याचा इशाराही शेतकर्यांनी दिला आहे. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाले तर दहा किलोमीटर पर्यंतचा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी रायते म्हणाले की, हीच वेळ आहे शेतकर्यांनी पेटून उठले पाहिजे जर सरकारने अस्तरीकरण न थांबवल्यास शेतकरी संघटना व शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.