पुणे: आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे हनुमंत साठे यांचे बुधवार दि.13 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. धनकवडी येथे दि.14 सप्टेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे मुलगा विरेन, पत्नी सत्यभामा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या 30 वर्षापासून आरपीआय पक्षात काम करीत होते. पक्षाच्या माध्यमातून दलित समाजातील मातंग व इतर समाजाला एकत्र करण्यासाठी त्यंचे खूप मोठे योगदान होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले. दलित समाजाच्या विविध प्रश्र्नांसाठी साठे कायम लढा दिला. पुण्यासह महाराष्ट्र भर त्यांच्या कामातून ओळख निर्माण झाली होती. त्यांचा अंत्यसंस्कार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित करण्यात आला.