बारामती(वार्ताहर): मानव सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी बारामती येथील कैलास शिंदे यांना नुकतीच देण्यात आली. मानव सुरक्षा सेवा संघाचे संस्थापक गजानन इंगळे, अरूणकुमार कांबळे व दिलीप कंखर यांनी निवड केली. कैलास शिंदे यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत दिव्यांग लोकांसाठी मदतीची जी चळवळ सुरू केली. या सर्व बाबींचा विचार करीत कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड केली आहे. या संघटनेतील कैलास शिंदे प्रथमच अशी व्यक्ती आहे त्याचा स्पेशल सन्मान केला जात असल्याचा अभिमान आहे.