बारामती(वार्ताहर): तरुणाईच्या विचारधारेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या शरयु फौंडेशनच्या जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे बिगूल वाजले आहे. या स्पर्धेत शिक्षक व पालकांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आलेला असल्याचे शरयु फौंडेशनचे अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार यांनी कळविले आहे.
पुन्हा एकदा आंतरशालेय विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपली थेट मते, विचार मांडण्याची संधी देणार्या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात दि.16 सप्टेंबर 2022 रोजी ज्ञानसागर गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कूल सावळ, ता.बारामती याठिकाणी सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत होणार आहे. शालेय स्तरावरील तरुणाईला आपल्याशा वाटणार्या, त्यांच्या वक्तृत्वगुणांना आव्हान देणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या शिलेदार सज्ज झालेले आहेत.
या स्पर्धेत इयत्ता 2 री ते 4थी पर्यंत लहान गट, 5 वी ते 7 वी पर्यंत मध्यम गट, 8 वी ते 10 वी पर्यंत मोठा गट तर शिक्षक व पालकांसाठी स्वतंत्र गट करण्यात आला आहे. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ याचठिकाणी दि.17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 11.30 वा. ठेवण्यात आला असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.