बारामती(वार्ताहर): राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासून माजी मंत्री महादेव जानकर यांचे खंदे समर्थक म्हणून नावलौकीक असलेले संदीप चोपडे यांची दुसर्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नुकतीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देवून निवड करण्यात आली.
संदीप चोपडे यांनी पंचायत समिती झारगडवाडी-सोनगाव गटातून निवडणूकीत विक्रमी मते घेऊन चमक दाखविली होती. राष्ट्रीय समाज पक्ष हा पुणे जिल्हा व बारामती बारामती तालुक्यात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजाविणारा पक्ष म्हणून संबोधला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला डोकंदुखी ठरणारा पक्ष ठरू शकतो अशीही चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे.
आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा पक्षाचा विचार असून सर्वसामान्य घटकाला उमेदवारी देणार असल्याचे संदीप चोपडे यांनी सांगितले. फेरनिवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.