बारामती लोकसभेला वन बुथ टेन युथ संकल्पना – महादेव जानकर

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येणार्‍या बारामती लोकसभा निवडणूकीत वन बु टेन युथ संकल्पनेनुसार पक्षाचा विस्तार वाढ करण्याचा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

इंदापूर येथे 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बूथ प्रमुख पदाधिकार्‍यांचा मार्गदर्शन कार्यक्रम इंदापूर येथील हॉटेल स्वामीराज येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्री.जानकर बोलत होते.

श्री.जानकर पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या हेतूने राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथ वर दहा दहा माणसे तयार केले पाहिजे या दृष्टीने महत्त्वाचे कानमंत्र जानकर यांनी कार्यकर्त्यांना दिले.

सदर कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे, ज्येष्ठ नेते विनोदराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी मार्कड, तालुका अध्यक्ष सतीश तरंगे, तानाजी शिंगाडे, बजरंग वाघमोडे, मनीष जाधव, शहाजी बाळे, नवनाथ कोळेकर आदींसह गावोगावीचे पक्षाचे बुथ प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!