हेमंत कांबळे यांचे अल्पश: आजाराने दु:खद निधन!

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): गोतंडी गावातील हेमंत आण्णा कांबळे (वय-35, रा.गोतंडी, ता.इंदापूर, जि.पुणे) यांचे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.

हेमंत कांबळे मनमिळावू व मितभाषी स्वभावाचे होते. गावातील सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत होते. सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ते करीत होते. त्यांच्या जाण्याने गोतंडी गावात शोककळा पसरली होती.

त्यांच्या पश्र्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!