अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): निरा डावा कालवा अस्तरीकरणाचा विषय ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे. इंदापूरच्या दोन्ही माजी मंत्र्यांनी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून बळीराजाचे प्रश्र्न सरकारसमोर मांडावे अशी हाक गोतंडीत बळीराजाने रास्ता रोको करून दिली आहे.
माजी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येऊन सरकारच्या समोर शेतकर्यांचे प्रश्न मांडावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. गोतंडी, शेळगाव, तलवाडा, निमगाव, कचरवाडी, जैनवाडी या ठिकाणाहून हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सरकारच्या व पाटबंधारे खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

शिवाय पाणी टंचाई निर्माण होईल तसेच कालवा शेतकर्यांच्याच मालकीचा आहे. कारण आजरोजी देखील सात बारा उतारावर कालव्याचे क्षेत्र आरक्षित झालेले नाही.त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय करू नका असे मनोगतातुन मत व्यक्त केले.यावेळी शासनाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे,मंडल अधिकारी शहाजी राखुंडे,जलसंपदा विभागाचे रतनकुमार झगडे, हनुमंत ननवरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
सरकार कुठलेही असो शेतकर्यांच्या मानगुटी पाय देत आहे. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण सुरू झाल्यास हे काम होऊ देणार नाही बळजबरीने काम सरकारने करण्याचा प्रयत्न केल्यास याच निरा-डावा कालव्यामध्ये जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी शेतकर्यांनी दिला आहे.
या रास्ता रोको गोतंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पाटबंधारे खात्याचे अधिकारी व महसूलचे सर्कल भाऊसाहेब व तलाठी प्रशांत कांबळे, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पीआय श्री.खंदारे व पोलीस अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना, भाजप इतर सर्व संघटनेचे पदाधिकार्यांनी उपस्थित राहून या अस्तरीकरणाला विरोध दर्शवला.
यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे, आप्पा पाटील काशिनाथ शेटे पोपट नलवडे, लक्ष्मण कांबळे, कुंडलिक नलवडे, माजी कृषी अधिकारी विठ्ठल पापत यांनी अस्तरीकरण झाल्यास आधीच शेती व्यवसाय अडचणी आहे त्यात भर पडले शिवाय कालव्याच्या नजीक वन विभाग असून वन्यप्राण्यांचे देखील पाण्यावाचुन हाल होणार आहेत.
यावेळी उपसरपंच परशुराम जाधव, दिनकर नलवडे, शिवाजी बनकर,अशोक कदम,गुरूनाथ पाटील,रामभाऊ काळे हौशी राव यादव, किशोर कांबळे विशाल कांबळे, गजराबाई जाधव, सुवर्णा कांबळे, पोलिस पाटील राजश्री हरीभाऊ खाडे,तलाठी प्रशांत कांबळे मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते. आंदोलनानंतर वालचंदनगर पोलिसांनी वाहतूक सुरळीतपणे सुरू केली.