राज प्रतिष्ठान दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा जय भवानी संघाने पाच थराचा मनोरा करीत दहिहंडी फोडली

बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे भिगवण रोड पंचायत समिती समोरील दहिहंडी उत्सवाचा राजथाट यावर्षीही पाहिला मिळाला. मनसे जिल्हाध्यक्ष ऍड.विनोद हनुमंत जावळे आयोजित राज प्रतिष्ठान दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

जय भवानी दहिहंडी संघाने पाच मनोरे रचत दहिहंडी फोडून रोख रक्कम व चषक मिळविले. या दहिहंडी उत्सवाचे आकर्षण मन झालं बाजींद आणि लागीर झालं जी..फेम सिने अभिनेत्री मिस कल्याणी सोनने यांनी गाण्यावरती ठेका धरत गोविंदांचा उत्साह वाढवला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, राजेंद्र बनकर, ऍड.सुभाष ढोले, पुण्याचे मानसउपचार तज्ञ डॉ.मिनू भोसले, अभिनेत्री स्मिता मधुकर, बालरोगतज्ञ डॉ.सौरभ मुथा, दंतरोग तज्ञ डॉ.साकेत जगदाळे, भाजपाचे जिल्हासंघटक अभि देवकाते, शहराध्यक्ष सतिश फाळके, युवा सेना जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे, ड्रीम सिटीचे धनंजय शिंदे, ऍड.विशाल बर्गे, ऍड.नितीन भामे, राजेश कांबळे, संभाजी माने, उद्योजक संतोष सातव, निलेश पलंगे, गोविंद देवकाते ,रोहन गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.

या उत्सवाचे आयोजन ऍड.विनोद जावळे यांनी केले होते. राज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले, संग्राम चांदगुडे, निलेश कदम, सुहास जावळे,ऋषिकेश पवार, बाबा सोनवणे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!