अस्तरीकरणाचे काम हाणून पाडू गोतोंडी गावचे शेतकरी आक्रमक

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम झाल्यास परिसरातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. सदरचे काम बळजबरीने करण्याचा प्रयत्न केल्यास हे काम शेतकरी हाणून पाडतील, असा इशारा गोतंडीगावाच्या परिसरातील शेतकरी बांधवांनी दिला.

अस्तरीकरणामुळे कालव्यातील पाण्याचा पाझर पूर्णत: बंद होणार आहे. यामुळे विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडणार आहेत. त्याचा फटका शेतीला बसणार आहे. अनेक कालव्यालगतच्या शेतकर्‍यांनी एक दोन गुंठे जमीन घेऊन विहिरी खोदून त्या विहिरीतून पाणी उचलून नेऊन शेती बागायत केली आहे. निरा-डावा कालव्याचा आवर्तन सुटल्यानंतर कालव्यातील पाणी पाझरून किमान दोन कि.मी.पर्यंतच्या शेतकर्‍यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. अस्तरीकरण झालेनंतर या शेतकर्‍यांची शेती अडचणीत येणार आहे.

अस्तरीकरणच्या विरोधात दिशा ठरवण्यासाठी गोतंडी परिसरातील शेतकरी एकत्र येणार तसेच गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे म्हणाले, नीरा डावा कालव्याचे पहिल्या टप्प्यात सुमारे 35 किलोमीटर एवढे अस्तरीकरण होणार आहे. हे काम जर झाले तर कालव्याच्या परिसरातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडणार आहे. अस्तरीकरण झाल्यास शेतीमा लाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊन शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे. या वेळी शेतकरी माझी सरपंच शोभना कांबळे, काशिनाथ शेटे, आप्पा पाटील,अनिल खराडे, सुनील कांबळे, परशुराम जाधव, पोपट नलवडे, छगन शेंडे, आबा मार्कड, किशोर कांबळे, शंकर भोंग, शिवाजी मुलमुले, रामभाऊ काळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!