बारामती(वार्ताहर): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खाटीक गल्ली तालीम संघ आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 चे आयोजन केले होते. योगेशभैय्या जगताप मित्र मंडळाने दहिहंडी फोडून राष्ट्रवादी चषक 2022 पटकावला. यावेळी विश्वास नाना देवकाते, संभाजी नाना होळकर, अमर धुमाळ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर व दरम्यान काळात आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण इंगुले व तालिम संघाच्या पदाधिकार्यांनी केले. दहिहंडी बांधलेले फुलांचे डेकोरेशन गोपाळ भक्तांचे लक्ष वेधत होते.