बारामती(वार्ताहर): विक्रमी गर्दीत अभिनव दहिहंडी संघाने स्व. धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरीयल ट्रस्टची दहिहंडी फोडून यावर्षीही दहिहंडी फोडण्याचा मान पटकावला. चषक व 56 हजार रूपयांचा धनादेश बक्षिस स्वरूपात देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीनहत्ती चौकात जयसिंग (बबलू) देशमुख यांच्या वतीने दहिहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. अभिनव दहिहंडी संघाने अंगावर शहारे आणणारा मनोरा उभा केला. ज्यावेळी दहिहंडी फोडली त्यावेळी असंख्य गोपाळ भक्तांचा जीव भांड्यात पडला. अभिनव दहिहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मिकी यांनी आयोजकांचे आभार मानले.
गेली दहा वर्ष या दहिहंडी उत्सहाचे सुत्रसंचालन करण्याची संधी ज्ञानेश्र्वर जगताप यांना मिळत आहे.