बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कायद्याचे पालन करीत दहाच्या आत स्पीकर बंद व दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रमाची परंपरा युनिटी फ्रेंडस् सोशल क्लबने जोपासली.
यंदाचे 25 वे वर्ष असुन, जय हनुमान दहिहंडी संघ आमराई यांनी दहिहंडी फोडून 21 हजार रूपये व चषक प्राप्त केले. यावेळी पत्रकार अमोल तोरणे, तैनुर शेख, प्रमोद ठोंबरे, उमेश दुबे उपस्थित होते.
आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे व मान्यवरांचे स्वागत व आभार माजी नगरसेवक निलेश (आप्पा) इंगुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेतन इंगुले, अक्षय इंगुले, सनी नागे, बाळा इंगुले, रवि करळे, सोमा धनराळे, अमीत पलंगे, आलताफ शेख, जमीर शेख, फारूख सय्यद, ऋषिकेश इंगवले, राजेश काळे, अजिंक्य सोनवणे, शुभम बिंद्रे, यश घोणे, ओम इंगुले, जवारे बंधु, खडके बंधु, पलंगे बंधू यांनी मोलाचे सहकार्य केले.