बारामती(वार्ताहर): शिस्तबद्ध संघ म्हणून नावलौकीक मिळविलेल्या कै.पै.वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघाची भिगवण चौक येथील दहिहंडी जय हनुमान संघाने पाच मनोरे उभे करीत फोडली. संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ऋतुराज अर्जुनराव काळे व उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे यांनी 21 हजार रूपये व चषक देवून जय हनुमान संघाचा गौरव केला.
दरवर्षी कै.पै.वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघ जेजुरी येथील शिवसेवा संघ, पुणे येथील मंडई, शुक्रवार पेठेतील सुबुद्ध मित्र मंडळ, डॅड गिफ्ट ग्रुप, अजयभाऊ दराडे मित्र परिवार व कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघ यासह इतर दहिहंडी फोडण्याचा मान पटकावित आलेला आहे. संघातील प्रत्येक गोपाळ भक्ताची काळजी घेणारा संघ आहे.