उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनची गुन्हे उघडकीस करण्याची तत्पर सेवा

बारामती(वार्ताहर): बारामतीला लाभलेले सक्षम उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनची गुन्हे उघडकीस करण्याची तत्पर सेवा नागरीकांची मने जिंकत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, चोरी तसेच इतर छोटे-मोठे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे.

बारामती शहरात घडलेल्या खूनाचा तपास तातडीने करून अल्पवयीन मुलांना अटक करण्यात यश आहे. नायलॉन मांजावर धडक कारवाई करून मांजाचा साठा जप्त करण्यात आला. महाविद्यालयीन आवारात विना परवाना वाहन चालविणार्‍या विद्यार्थ्यांवर व रोडरोमिओंवर कारवाई केली. विशेष म्हणजे गुणवडीतून हरवलेल्या पाच मुलांचा बारामती शहर पोलिसांकडून कौशल्याने व जलद तपास केल्याने कित्येकांचा जीव भांड्यात पडला. वेळोवेळी नागरीकांना जागृत करण्याचे काम सुद्धा शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे.

बारामती शहरात शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती, दहिहंडी उत्सव साजरे करणार्‍या मंडळांना दिलेल्या सूचना देवून चोख बंदोबस्तात कार्यक्रम, उत्सव साजरे करण्यात आले विविध मंडळांनी सुद्धा पोलीसांना सहकार्य केले. मनोरूग्णांना सुद्धा येरवडा याठिकाणी दाखल केले.

बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी शहर पोलीसांनी कंबरच कसली आहे. मुख्य चौकात वाहतुक पोलीसांची नेमणूक करून त्याठिकाणी बेशिस्त वाहनांवर कारवाई केल्याने सदरचे ठिकाण पाहण्याजोगा दिसत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशने पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक व त्यांच्या सर्व टीमने कायदा व सुव्यवस्थेबरोबर नागरीकांना पोलीस आपलेसे वाटावे म्हणून त्या पद्धतीने काम केले आहे. चुकीचे व दबावापोटी गुन्हे श्री.महाडिक आलेपासून दाखल झाले नाहीत ही खूप महत्वाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!