बारामती(वार्ताहर): येथील मनोज भगत निशाण आखाडातर्फे भगवान जाहरवीर गोगाजी महाराज यांच्या काठीचे पूजन व महाआरती महाराष्ट्राच्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा व पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उपाध्यक्षा ऍड.रूपाली ठोंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रामुख्याने पुणे संजय गांधी निराधार योजनेच्या सरीता काळे, वंदना साळवी, निसर्गा कोटा, मनिषा कावेडिया, कॉन्ट्रॅक्टर उत्तम धोत्रे, पत्रकार तैनुर शेख उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, आ.अजित पवार यांचे स्वीसहाय्य हनुमंत पाटील, मा.नगरसेवक राजेंद्र बनकर, जयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, दिनेश जगताप, आदित्य हिंगणे हे उपस्थित राहुन छडीचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यात शहराच्या दिशेने गोगाजी महाराज यांची काठी घेऊन व वीर गोगादेवजींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. यामुळे शहरात येणारा सर्व त्रास शांत होतो व पिडीताच्या अंगाला काठीने स्पर्श केला तर तो पिडीत बरा होतो अशी श्रद्धा आहे.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मा.नगरसेवक कुंदन लालबिगे, मनोज लालबिगे, राकेश वाल्मिकी, युवराज खिराडे, मनिष लालबिगे, अमित लालबिगे, संदीप जेधे, अक्षय बिवाल, निहाल वाल्मिकी, चंदन लालबिगे यांनी केले.