बारामती(वार्ताहर): येथील सामाजिक कार्यात हिरीरीने काम करणारी जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे गोर-गरीब कुटुंबियांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने हर घर झेंडा अभियान राबविण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेतर्फे बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील पारधी कुटुंबियांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश संजय महाडिक, सचिव चैतन्य शेखर गालिंदे व अभय गालिंदे यावेळी उपस्थित होते.