बारामती(वार्ताहर): भारत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत पूर्व निहित संगम फौंडेशनतर्फे विविध शाळांमध्ये मोफत 10 हजार तिरंगाध्वजाचे वाटप करण्यात आले.
अमृत महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. संस्थेचे चेअरमन नितीन आटोळे, व्हाईस चेअरमन कुमार देवकाते, संचालक नितीन चालक, खजिनदार दत्तात्रेय शिंदे, योगेश सस्ते, गणेश जगदाळे, प्रदीप लोणकर, गणेश कदम, मधुकर गाढवे, सागर पार्लेकर, अजय नाझीरकर, ऍड.हेमाडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील पुढील शाळांमध्ये ध्वज वाटप करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल मेखळी (बारामती), श्री नागेश्वर विद्यालय नाझरे (पुरंदर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरे सुपे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी खुर्द (पुरंदर), विश्वासराव रणसिंग महाविद्यालय वालचंदनगर (इंदापूर), जिल्हा प्राथमिक शाळा मळद (बारामती), न्यू इंग्लिश स्कूल लाकडी (इंदापूर), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मूर्टी (बारामती), न्यू भैरवनाथ विद्यालय काजड (इंदापूर), श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव (इंदापूर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ननवरे मळा जाचकवस्ती (इंदापूर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 दोरगेवाडी यवत (दौंड), ग्रामपंचायत कटफळ (बारामती), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी (बारामती), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन (बारामती), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेवाडी (बारामती).