बारामती(वार्ताहर): भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य मिळूनही आज आपण जातीवाद, भेदभावात गुंतलेलो असल्याचे प्रतिपादन शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार यांनी केले.
दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवनिमित्त आई प्रतिष्ठाच्या वतीने 50 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, 50 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट, 15 सिमेंट बाकडे, 100 गरजु कुटुंबियांना मिठाई व 100 गरजु महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.

यावेळी नगरपरिषदे मुख्याधिकारी महेश रोकडे, फकरूशेठ कायमखानी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, बारामती बँकेचे मा.संचालक सुभाष जांभुळकर,शिरीष कुलकर्णी, बा.न.प.चे नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, माळेगांव कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बन्सीलाल मुथा, नगरसेविका सौ.डॉ.सुहासिनी सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, इमरान पठाण, संतोष गालींदे, निलेश पलंगे, संतोष टाटिया, अभिजीत एकशिंगे, सोमनाथ नाळे, पत्रकार तैनूर शेख, मा पोलीस उपनिरीक्षक डी.सी.(आबा) जाधव, विजय शितोळे, मज्जित पठाण, राजेंद्र सोनवणे, सुनील धुमाळ, संजय चव्हाण, महेश आगवणे, सलीम शेख, निलेश मोरे, बबलू जगताप, दत्तात्रय काळे, दिलीप काळे, अनंता काळे, यांच्या बहुसंख्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सौ.पवार म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली खर्या अर्थाने आपण स्वातंत्र झालो आहोत का? याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. इंग्रज गेले त्यांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला. आज आपण एकमेकांशी कसे वागतो, कृती करतो याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जात, धर्म व पक्ष कोणताही असो सर्वांनी माणूसकी धर्म अंगी जोपासला पाहिजे.

पुढे बोलताना सौ.पवार म्हणाल्या की, या कार्यक्रमास बहुसंख्य विविध समाजातील व घटकातील लोकं उपस्थित होते याचा अभिमान वाटतो. जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो, वर्षाचा विचार करणारा धान्य पेरतो आणि आयुष्याचा विचार करणारे माणसं जोडतो. शरयू फौंडेशनच्या माध्यमातून गोर-गरीब शेतकर्यांसाठी विहिरी, शेततळे, नाला ओढीकरणाचे कामे केली व करीत आहोत. या माध्यमातून असंख्य लोकं फौंडेशनशी जोडली गेली असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. सत्यव्रत काळे नगरसेवक आहेत पुढील काळात आणखी मोठ-मोठी पदे मिळतील तुमची साथ महत्वाची आहे. सामाजिक व राजकीयदृष्ट्या योग्य ट्रॅकने सत्यव्रत काळे चाललेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सत्यव्रत काळे आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत असलेल्या कामांचे कौतुक करीत पुढील काळात असेच कार्य करीत रहावे. कार्य करणार्याच्या मागेच लोकं असतात त्याचा पुरावा म्हणजे आज सर्वस्तरातून उपस्थित असलेले लोकं आहेत.
यावेळी इम्रान पठाण, नवनाथ बल्लाळ, गिरीष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले व कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी मानले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रफिक शेख, अक्षय पवार, समाधान दिंडकर, दीपक शिंदे, मंगल पवार, पिंटू पवार, नागेश कासार, किरण माने, गणेश कुचेकर, सुशांत काळे, रोहन माघाडे, निलेश शेंडगे, विवेक गायकवाड, अण्णा कसबे, अमीर झारी, युवराज खिराडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.