बारामती: येथील ध्येयवेडे एकनाथ देशमाने यांनी 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे कणखर विरोधी पक्ष नेते आ.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड ते दौलताबाद असे 36 जिल्हे सायकलवरून महाराष्ट्र दर्शन करणार आहेत.
दि.15 ऑगस्ट रोजी बारामती येथून महाराष्ट्र दर्शनास सुरूवात करणार आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या शुभहस्ते फ्लॅग दाखवून सुरूवात करणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात 8 ते 9 हजार किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. त्याचबरोबर युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत म्हणजे टूर दे फ्रान्स आहे. यामध्ये जाण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. दरवर्षी जुलै महिन्यात साधारण तीन आठवडे चालणार्या या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे 3 हजार 600 किमी अंतर पूर्ण करतात. या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो. ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शॉंज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो.
सायकल प्रवास करीत असताना ते सायकल चालवा पर्यावरण वाचवा, पाणी-इंधन वाचवा, किल्ला वाचवा शिक्षित मुली, हिरवीगार झाडे वाचवा, वाघ वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा व रक्तदान करा, पर्यावरणाचा र्हास टाळा, पृथ्वी वाचवा, कचरा डस्टबिनमध्ये टाका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, वीज बचत करा इ. सारखे संदेश देत असतात.
रीक्षा चालवणारा एकनाथ कुठून कुठे जाऊ शकतो, तर हे सायकल चालविणारे एकनाथ मनी केलेले ध्येय नक्कीच गाठू शकतात हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. एकनाथ देशमाने यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा त्यांचे देशाबद्दल विशेषत: बारामतीबद्दल व येथील नेतेमंडळींबद्दलचे अतुट असे प्रेम आहे. अशा ध्येयवेडे एकनाथासाठी मदतीचा हात पुढे यावा अशीही नागरीकांमधून मागणी होत आहे.