अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त 75 महोत्सव गोतंडी ग्रामपंचायतच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. ढोल ताशाचा गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सेवानिवृत्त मेजर शरीफ सय्यद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गोतंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या ध्वजारोहण जयश्री दिनकर नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले व तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण गोतंडी गावचे पोलीस पाटील राजश्री हरिभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त हवलदार लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दगडू दादा बनसोडे विद्यालयाचे ध्वजारोहण शिवाजी मार्कड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोतंडी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा यांचे ध्वजारोहण शाळेचे चेअरमन नवनाथ शिवाजी मार्कड यांच्या हस्ते करण्यात आले.या ध्वजारोहणाकरिता गोतंडी पंचक्रोशीतून सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.