अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): तालुक्यातील रेडणी गावचे सुपूत्र विजय संजय देवकाते यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा संपूर्ण देशात 92 व्या रँकने उत्तीर्ण केलेबद्दल निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील युवक जिद्द, कष्ट व बुद्धिमत्तेच्या जोरावर केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. विजय देवकाते यांचे हे यश युवकांना प्रेरणादायी असे आहे, असे गौरोद्गार राजवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी अमरदीप काळकुटे, उपसरपंच प्रकाश शेडगे, मच्छिंद्र तरंगे, हनुमंत तरंगे, रामभाऊ तरंगे, हनुमंत तरंगे गुरुजी, देवकाते कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.
काय आहे केंद्रीय लोकसेवा आयोग –
केंद्रीय लोकसेवा आयोग ही भारताची केंद्रीय निवड संस्थाआहे. हा एक संवैधानिक आयोग आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट-अ व गट-ब कर्मचार्यांची निवड करण्याकरीता जबाबदार आहे. ही संस्था कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातल्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखाली येते.