बारामती(वार्ताहर): कै.वस्ताद बाजीराव काळे दहिहंडी संघाचा सरावाचा नारळ शुभारंभ काळेनगर येथील ज्येष्ठ नागरीक संपतआण्णा कुचेकर यांच्या शुभहस्ते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कै.वस्ताद बाजीराव काळे दहिहंडी संघ शिस्तीचा संघ म्हणून मानला जातो. व्यसनी लोकांना या संघात थारा नाही. जेजुरी, फुरसुंगी, पुणे शहर इ. ठिकाणी दहिहंडी फोडण्याची गेल्या 40 ते 45 वर्षाची परंपरा राखली आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व गोपाळ भक्तांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष डॉ.ऋतुराज काळे यांनी केले. यावेळी धैर्यशिल काळे, ऍड.वैभव काळे, पत्रकार सुरज देवकाते, तैनुर शेख व बहुसंख्य गोपाळ भक्त उपस्थित होते.