दिलेला शब्द पाळणारे पवार कुटुंबिय युगेंद्र पवार यांचेकडून 100 डस्टबिन प्रदान

बारामती(वार्ताहर): पवार कुटुंबियांतील व्यक्तींनी एकदा दिलेला शब्द हे आश्र्वासन नसते तर प्रत्यक्षात दिलेला शब्द पाळतात हे युगेंद्र पवार यांनी 100 डस्टबिन बारामती नगरपरिषदेला प्रदान केले.

महेश गायकवाड यांनी स्वच्छ, सुंदर बारामतीचा विचार करीत वसंतनगर येथील वासियांना डस्टबिनचे वाटप युगेंद्र पवार यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात श्री.पवार यांनी 100 डस्टबिन बारामती नगरपरिषदेस देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्यांनी दि.10 ऑगस्ट रोजी बारामती नगरपरिषदेत महेश गायकवाड यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगून 100 डस्टबिन स्वाधीन केले.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, युवती अध्यक्षा सौ.आरती शेंडगे, मा.नगरसेवक गणेश सोनवणे, वसंतनगर येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असलेले महेश गायकवाड, नगरपरिषदेचे सुनिल धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, सुनिल दुबे, संजय चव्हाण, देविदास साळुंखे, संतोष तोडकर,भालचंद्र ढमे, शंकर गव्हाळे इ. मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!