बारामती(वार्ताहर): दहिहंडी संघातील युवा वर्ग हीच खरी त्या संघाची संपत्ती असल्याचे मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
योगेश (भैय्या) जगताप दहिहंडी संघाचा नारळ सराव शुभारंभ प्रसंगी सौ.तावरे बोलत होत्या. यावेळी बारामती बँकचे अध्यक्ष सचिन सातव, मा. उपनगराध्यक्ष जय पाटील, माजी नगरसेविका अनिता जगताप, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने, अथर्व जगताप, माजी नगरसेवक अभिजीत काळे, श्रीजीत पवार, ढेकळवाडीचे उपसरपंच शुभम ठोंबरे, नितीन थोरात, योगेश नालंदे, तानाजी पाथरकर, राकेश वाल्मिकी, शरीरसौष्ठव अक्षय मांडगे, सचिन मधुकर सातव, अभिजीत ओझर्डे, गणेश फाळके, पै.गणेश जाधव, अमोल पिसाळ, सागर काटे, गौरव पोटे, बाबु पवार, अक्षय शेरे, शैलेश पवार, ज्ञानेश्वर गवळी, गणेश कदम, सागर भिसे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.तावरे म्हणाल्या की, एवढा मोठा जनसमुदाय पाहुन या दहिहंडी संघावर व जगताप कुटुंबियावर असणारे प्रेम दिसते. अखंडित दहिहंडी उत्सव साजरा करीत आलेला हा संघ आहे. अनिता जगताप यांनी तत्परतेने प्रभागातील कामे मार्गी लावली. विविध प्रश्र्न सभागृहात मांडले. बबलू जगताप सामाजिक कार्यातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अनिता जगतापला प्रत्येक कामात बबलू जगताप यांची खंबीर साथ व पाठिंबा असल्याने त्यांनी सक्षमपणे नगरसेवक पदाची धुरा संभाळली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विशाल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यानी केले तर आभार बबलु जगताप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बंटी जगताप, अजय नागे, सनी जगताप, धीरज पडकर, सोनु राठोड, राजपाल गायकवाड, गौरव भंडारे, गुडू पवार, गणेश पाठक, विकास जगताप, सुरज खलाटे, प्रकाश साबळे, विलास लोंढे, बाळा जगताप, सनी आटोळे, काळु दामोदरे, सोनु पवार सनी, पवार, व यस यस यस ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.