श्रीराम मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होणार!

बारामती(वार्ताहर): येथील श्रीरामनगर (जळोची) वै.ह.भ.प. भगवानराव बाबुराव तावरे यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये गोकुळ आष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह दि.12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2022 रोजी प्रारंभ होणार असल्याचे ऍड.हरिष भगवानराव तावरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

रोज पहाटे 4 ते 6 काकड आरती, दुपारी 3 ते 6 संगीतमय भागवत कथा, सायं. 6 ते 7 हरिपाठ व रात्री 9 ते 11 श्रीहरी किर्तन व नंतर हरिजागर हे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.

आळंदीचे ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मोहाडीकर भागवत हे कथा प्रवक्ते आहेत. नामवंत किर्तनकारांचे किर्तन या कालावधीत होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!