कोऱ्हाळे बु॥: येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे पवार साहेबांचे बंधू कै. वसंतराव पवार (दादा) यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त, नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 23 व्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित राहून उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
गेल्या 22 वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारा हा उपक्रम केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, या स्पर्धेने आजवर कित्येक अभ्यासू वक्त्यांबरोबरच नामवंत पत्रकार आणि प्रगल्भ कीर्तनकार घडवून तालुक्याला व जिल्ह्याला एक वैचारिक दिशा दिली आहे.
या यशस्वी आयोजनाबद्दल नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सतीश खोमणे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व तरुण वक्त्यांचे मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!