दुष्काळाचे सावट, त्यात इले.मोटार केबल चोरी शेतकरी हवालदिल: भिगवण पोलीसांनी केला केबल चोर जेरबंद, पोलीसांचे कौतुक!

भिगवण(प्रतिनिधीःहेमंत भोसले): पाऊस पडत नसल्याने दुष्काळाचे सावट, अशा परिस्थितीत शेती पंपाच्या कॉपर केबल चोरी या सर्व प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या सर्व बाबींची गंभीरता ओळखून भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशान्वये थेट केबल चोरणारा अट्टल गुन्हेगारास जेरबंद केल्याने शेतकरी वर्गात पोलीसांच्या कार्याबाबत कौतुक होत आहे.

11 सप्टेंबर रोजी रात्रौ दोन, सव्वा दोनच्या दरम्यान मदनवाडी (ता.इंदापूर) गावचे हद्दीत 3 पानबुडी मोटारीच्या फिनोलेक्स कंपनीच्या निळ्या रंगाची 70 मी. केबल 11 हजार 200 रूपयांची चोरी गेलीबाबत पांडूरंग मारूती बंडर (रा.मदनवाडी) यांनी फिर्याद दाखल केली. पोलीसांनी तात्काळ गुन्हा रजि. नंबर. 228/2026, भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम. 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनिय बातमी काढुन मदनवाडी मधील दक्ष नागरीक यांचे मदतीने आरोपी नामे टिकु रामसेवक राजपुत (वय 31, मुळ रा.नगला इमली, शाहपुर ब्राम्हण, आग्रा, राज्य. उत्तर प्रदेश, सध्या रा.मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचा सखोल तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हयातील मुद्देमाल काढुन दिला.

सदर आरोपीकडे अधिक विचापुस केली असता, भिगवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 18 शेतकऱ्यांचा 1 लाख 76 हजार 250 रूपये किंमतीचा केबल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्हयातील शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या गुन्हयांचा सखोल तपास करून ते गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबत सक्त सुचनेनुसार भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी गुन्हे शोध पथक (डी.बी) यांना मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी जेरबंद करण्यात यश आले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, नाना वीर, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, सचिन पवार, समीर झांबरे, सचिन भस्मे, शहाजी सुद्रीक, मदनवाडी मधील दक्ष नागरीक यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!