बारामतीः तालुका पोलीसांनी 1 लाख 70 हजाराचे सोन्याचे मंगळसुत्राचा मुद्देमाल परत देऊन, फिर्यादीस भावनिक व धार्मिकदृष्ट्या एक प्रकारे आधार दिल्याने तालुका पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नामे सौ.अनुराधा संतोष पागळे (रा.जळोची) या 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास मौजे कन्हेरी (ता.बारामती) येथुन जळोचीच्या दिशेने मोटार सायकलवरून येत असताना, कन्हेरी गावच्या हद्दीत जळोची रोडवर बटरफ्लाय गार्डनचे पुढे पाठीमागुन येणाऱ्या मोटर सायकल स्वार दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करुन, थांबवुन पाठीमागे बसलेल्या इसमाने सौ.पागळे यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र (दोन डोरले असलेले फॅन्सी मंगळसुत्र) चोरून नेले.
सौ.पागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बारामती तालुका पोलीस स्टेशनला त्याच दिवशी येऊन गु.र.नं.154/2026 अन्वये भारतीय न्याय संहीता 2023 कलम 304 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याच्या तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे हे तपास करीत असताना, आरोपी नामे गणेश मंगेश काळे (वय-22, रा.कुळधरण ता.कर्जत जि.अहिल्यानगर) यांस तात्काळ अटक करून, सदरचा चोरीला गेलेला मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला.
भारतीय नागरीक सुरक्षा संहीता 2023 कलम 106(3) प्रमाणे पोलीसांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी सौ.पागळे यांना परत देणेत आला.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहा.पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे, मुद्देमाल कारकुन भारती खंडागळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मंगळसुत्र हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हरवणे किंवा चोरीला गेल्यावर कुटुंबाच्या मनात भीती किंवा अपशकुनाची शंका येणे स्वाभाविक आहे. ज्याचा सोन्याचा दागिणा जातो त्याची काय परिस्थिती असते हे पोलीसांना चांगले ज्ञात आहे. त्याच भावनेतून व विचार करून बारामती तालुका पोलीसांनी यामध्ये तपास करून सदर महिलेला दागिणा परत केला आणि सदर महिलेच्या चेहऱ्यावर जे हास्य होते त्यामध्येच पोलीसांनी केलेले कार्य दिसून आले.