बारामती(वार्ताहर): महिलेंच्या आरोग्याविषयी, नेहमीच सजग असणार्या हिरकणी सॅनेटरी नॅपकिन्स्च्या वतीने विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर पिंपळी येथे विद्यार्थिनींना अल्पदरात सॅनेटरीनॅपकिन्स् उपलब्ध होण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात आली. हिरकणीच्या वतीने वेडींग मशीन देण्यात आली.

विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदीर शाळेच्या प्राचार्या सौ.कल्पना बारवकर यांच्या शुभहस्ते पार पडले. सदर प्रसंगी सौ.शेट्टी तसेच हिकरणी सॅनेटरी नॅपकीन्सच्या वतीने अक्षय साबळे व बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

तसेच 1ऑगस्ट 2022 रोजी विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर बारामती या शाळेमध्ये सॅनिटरी वेंडींग मशीन बसवण्यात आली. या वेळी उपप्राचार्या सौ.रुपाली जाधव, अक्षय साबळे, कु.ऋतिक शिंदे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शाळेच्या वाइस कॅप्टन कु.नक्षत्रा माने यांच्या हस्ते अक्षय साबळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.