बारामती(वार्ताहर): शासनाच्या घर घर तिरंगा या उपक्रमासाठी मान्यताप्राप्त खादीचे राष्ट्रीय तिरंगा ध्वजाला चांगली मागणी आहे. यंदा मागणी जादा असल्यामुळे खादीचे पातळ व जाड कापड मधील विविध आकारातील तिरंगा ध्वज उपलब्ध आहेत विविध आकारा प्रमाणे दर ठरलेले आहेत. सध्या मागणी जास्त असल्यामुळे तिरंगा ध्वज कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. सागर खादी भांडार या दुकानात गेली ऐंशी वर्षा पासून ध्वजांची विक्री केली जात आहे. रास्त दरात उत्तम प्रतीचे मान्यताप्राप्त ध्वज विक्री केंद्र म्हणून सागर खादी भांडारचा पुणे जिल्ह्यात नावलैकिक आहे. 1943 सालापासून स्वातंत्र्यपुर्व काळात पुणे जिल्हा मधील पहिले खादी भांडार ग्राहकांच्या सेवेत सुरु आहे. सध्या या खादी भांडारात तिसरी पिढी कार्यरत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, राष्ट्रप्रेम जागवा ,तिरंगाचा सन्मान राखा असे आवाहन सागर खादी भांङार झेंडा विक्रेते यांनी केले आहे.