बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी 102 वी जयंती बारामती शहारा मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून बुध्दपूजापाठ घेण्यात आला.
या वेळी प्रा.रमेश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गौरवशाली कार्याचा धगधगता इतिहास त्यांनी उपस्थितांपुढे मांडला.
यावेळी या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासकीय अधिकारी हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी नगरसेविका अनिता जगताप, आरती शेंडगे, माजी नगरसेवक बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, अभिजित चव्हाण,अभिजित जाधव, आप्पा अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते मा.प सवाणे, रमेश साबळे,साधू बल्लाळ,चंद्रकांत खंडाळे, विशाल जाधव,नितीन शेला, संजय वाघमारे,शैलेश सोनवणे, अभिजित कांबळे,रवींद्र सोनवणे, मुनीर तांबोळी,उत्तम धोत्रे, सुरज शिंदे,ऍड.रियाज खान,विशाल घोडके,सोमनाथ लोंढे व आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे, शुभम अहिवळे,परीक्षित चव्हाण, चेतन साबळे, विश्वास लोंढे, सचिन काकडे, कैलास शिंदे, सिद्धार्थ शिंदे, संतोष जगताप, सचिन जगताप आकाश शेलार यांनी केले होते.