मातंग समाज संघटनेद्वारे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती सालाबाद प्रमाणे मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मामा खंडाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.

29 जुलै 2022 रोजी चंद्रमणीनगर बुद्ध विहार या ठिकाणी समाजातील गरीब गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात आला. यावेळी 197 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चाळीस जणांना मोतीबिंदू आढळून आला. या लाभार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी 8 ऑगस्ट 2022 रोजी हडपसर या ठिकाणी पाठवण्यात आले.

30 जुलै रोजी अन्नदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी समाजातील सर्व घटकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य करण्यात आले. दि.1 ऑगस्ट 2022 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदापूर चौक या ठिकाणी सकाळी सात वाजता स्वागत कक्ष उभा करण्यात आला होता. यावेळी सकाळी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे इ. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

समाजातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी माता रमाई भवन या ठिकाणी सकाळी साडेअकरा वाजता घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रमुख चंद्रकांत मामा खंडाळे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी पाथरकर, बापू खंडाळे, संदीप खंडाळे, अभिराज पवार, आप्पा लांडगे, दादा लांडगे, गजानन गायकवाड, सचिन सकट इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!