नेतृत्व, जातीय सलोखा व संस्कृतीला उजाळा देणारा
अभिनव दहिहंडी उत्सव – मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर

बारामती(वार्ताहर): दहिहंडी उत्सवातून नेतृत्व निर्माण होते व सर्वांना बरोबर घेऊन, जातीय सलोखा ठेवणारा अभिनव दहिहंडी उत्सव असल्याचे प्रतिपादन मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.

जिल्हा बँक आमराई येथे अभिनव दहिहंडी संघाचा सरावाचा नारळ वाढविण्याचा समारंभ प्रसंगी श्री.गुजर बोलत होते.

यावेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, सुधीर पानसरे, सोनू काळे, विजयआबा सुर्यवंशी, मयुर लालबिगे, मा.नगरसेविका सौ.आरती शेंडगे, दिनेश जगताप, संतोष सातव, नितीन शेलार, सिकंदर शेख, गौतम शिंदे, नितीन थोरात, सद्दाम शेख, श्रीरंग जमदाडे, धनंजय जमदाडे, निलेश मोरे, पिंटू गायकवाड, विलास काटे, युवराज खिराडे, सुग्रीव निंबाळकर, मंगेश ओंबासे, गणेश काशिद, पप्पू खरात, अतुल कांबळे, सोहेल शेलार, समीर चव्हाण, अभिजीत चव्हाण, रमेश आटोळे, विठ्ठल गाढवे, परशुराम नाळे, निलेश लोणकर, आबा तावरे, सेवक अहिवळे, शुभम मोरे, सोनु साबळे, सागर लोंढे, अजय नागे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे किरण गुजर म्हणाले की, दहिहंडी संघ, गणपती मंडळातून नेतृत्व पुढे आले आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपून शिस्तीत हे उत्सव साजरे केले गेले पाहिजेत असेही ते म्हणाले.

यावेळी सचिन सातव, शुभम मोरे, आरती शेंडगे, नवनाथ बल्लाळ यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

अभिनव दहिहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष बुद्धवासी संदीपदादा मोरे असुन, नितीनबाबा मोहिते, सचिनभाऊ मोरे आधारस्तंभ असल्याचे अभिनव दहिहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मिकी यांनी यावेळी सांगितले.

आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत अभिनव दहिहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मिकी, मोरे व नितीन मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी केले. यावेळी अभिनव दहिहंडी संघाचे सर्व गोपाळ भक्त व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा…अशा कार्यकर्त्यांना नगरपालिकेचे तिकीट द्या…
अभिनव दहिहंडी संघाचा नारळ वाढविण्याच्या कार्यक्रमात युवकांनी केलेली तोबा गर्दी पाहुन, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नगरपरिषदेच्या निवडणूकीत ज्याच्या मागे त्याच्या घरचे सुद्धा नाहीत त्यांना तिकीट देत असते व ते निवडून सुद्धा येतात. मग पाच वर्ष पक्षाच्या विविध घडामोडीत पाहिजे तेव्हा गर्दी करण्यास हेच काही नगरसेवक कमी पडतात. राकेश वाल्मिकी, सचिन मोरे व बाबा मोहिते सारखे नगरसेवक झाले तर भविष्यात प्रत्येक पक्षाच्या घडामोडीत अशीच तोबा गर्दी पाहिला मिळेल अशी एकच चर्चा याठिकाणी सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!