इंदापूर नागरी सुविधा केंद्र (सेतू) वतीने शासनाची व जनसामान्यांची प्रतिमा उंचावणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): येथील तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी केल्याने शासनाची व जनसामान्यांची प्रतिमा उंचावण्याचे काम केल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून उत्कृष्ट अधिकारी म्हणून गुणगौरव करण्यात आला. याचेच औचित्य साधुन इंदापूर येथील नागरी सुविधा केंद्र (सेतू) यांच्या वतीने तहसिलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

1 ऑगस्ट महसूल दिन हा आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे. महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी आदी योजना महसूल खात्यामार्फत राबविल्या जातात. या सर्व कामांमध्ये इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी गोरगरीब, शेतकर्‍यांना सतत मदतीचा हात देवून कामे मार्गी लावली.

या सर्व बाबींचा विचार करीत एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून डॉ.राजेश देशमुख यांनी त्यांचा गुणगौरव केला. इंदापूर सत्कार समयी नागरी सुविधा केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!