अशोक घोडके यांजकडून
इंदापूर(प्रतिनिधी): समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसन यातून मुक्त करायचे असेल तर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करा असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी केले.
इंदापूर येथील साठेनगर मध्ये शहराच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, नगरसेवक भरतशेठ शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, नगरसेविका राजश्री अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, श्रीधर बाब्रस, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, पी.आय. तय्युब मुजावर, जिल्हा उपरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संतोष खामकर, मुख्याधिकारी रामराजे कापरे मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे, प्रा.बाळासाहेब मखरे, राजेंद्र सागर, चंद्रकांत सोनवणे, राजु गुळीक, ललेंद्र शिंदे, उमेश ढावरे, रमेश आबा शिंदे, वसिमभाई बागवान, पंकज सुर्यवंशी, नाथा ढावरे उपस्थित होते.
जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मयूर ढावरे, उपाध्यक्ष गणेश आडसुळ, खजिनदार गोरख ढावरे, कार्याध्यक्ष विशाल ढावरे, सहखजिनदार गणेश केंगार, सहकार्याध्यक्ष ऋषिकेश सागर, सचिव किरण सागर, सहसचिव महेश ढावरे, सजावट प्रमुख अरविंद ढावरे, सदस्य संतोष लोखंडे, राजु शेख इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.