बारामती(वार्ताहर): राज्यामध्ये अनेक पतसंस्था आहेत परंतु, बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेने आर्थिक घडी बसवून आर्थिक शिस्तीचा आदर्श घालून दिला असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा सुद्धा दिल्या.
बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री.रोकडे बोलत होते.
याप्रसंगी मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मा.गटनेते सचिन सातव, चेअरमन सुनील धुमाळ, व्हाईस चेअरमन प्रतिभा सोनवणे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक राजेंद्र सोनवणे, भालचंद्र ढमे, चंद्रकांत सोनवणे, फिरोज आत्तार, दादासाहेब जोगदंड, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे, अजय लालबिगे, दीपक आहिवळे, सुवर्णा भापकर, सचिव अनिल गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालक मंडळाने याही वर्षी सभासदांना 12टक्के लाभांश घोषित केला संस्थेने एप्रिल 2022 पासुन 7 लाख 50 हजार कर्जाची मर्यादा केली असुन व्याजाचा दर 7टक्के करण्यात आला. सालाबादप्रमाणे याहीवर्षी नामांकित कंपनीचे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सभा संपल्यानंतर करण्यात आले अहवाल वाचन सचिव अनिल गोंजारी यांनी केले तर सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे चेअरमन सुनिल धुमाळ व राजेंद्र सोनवणे यांनी दिले. 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
राज्यामध्ये पतसंस्थेने सहकार पुरस्कार प्राप्त केला हीच खरी सभासदाच्या व संचालकांच्या यशाची पावती असल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले. गटतट विसरून सर्व संचालक एकत्रित उत्कृष्ट कार्य करत असल्याने संस्थेची प्रगती होत असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा चेअरमन सुनील धुमाळ यांनी घेतला तर अहवाल वाचन सचिव अनिल गोंजारी यांनी केले. या प्रसंगी दहावी व बारावी मधील उत्तीर्ण सभासदाचे पाल्य व सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सभासदाच्या शंकाचे निरसन संचालक मंडळाने केले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र सोनवणे यांनी मानले.