इंदापूर(प्रतिनिधी): जंक्शनच्या तरूणांनी मिळून जंक्शन ग्रामपंचायत निवडणूकीत जंक्शनची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी, नंदकिशोर ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते संभाजी बनसोडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले आहे.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, माझ्याकडे आज कोणतेही पद नाही मात्र, सामाजिक कार्यासाठी दोन पाऊल पुढे होऊन हिरीरीने कार्य सिद्धीस नेत आलेलो आहे. अशाच सामाजिक कार्यातून जंक्शन बस थांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी प्रवाशी व इतर प्रवाशांच्या हितासाठी कोणताही अनर्थ घटना घडू नये म्हणून सीसीटीव्हीची केलेल्या मागणीनुसार सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यश आले.
आधार कार्डसाठी होणारी हेळसांड पाहता आधार कार्ड काढण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले व बहुसंख्य नागरीकांनी आपले आधार कार्ड काढले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कोरोनाची भिती, दडपणच्या खाली लसीकरण करून घेण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत दखल घेत मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करून लसीकरण मोहिम राबविली व या मोहिमेत सुद्धा बहुसंख्य नागरीकांनी लाभ घेतला.
काही कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तरूणांनी आर्थिक गरज भागविण्यासाठी सावकारांकडून कर्ज स्वरूपात घेतलेले कर्ज त्यावरील व्याज यामध्ये ते कुटुंब व व्यक्ती मेटाकुटीस आलेला होता. अशा अनेक कुटुंबांना सावकाराच्या जाचातून मुक्तता करण्यामध्ये यश आले असल्याचेही संभाजी बनसोडे यांनी सांगितले आहे.
जंक्शनची लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या पटीत असणारे रेशनिंग दुकान त्यामुळे होणारी गर्दी यामुळे कित्येकांना शिधा मिळत नव्हता किंवा मिळण्यास खुप अटापिटा करावा लागत होता. याबाबत विचार करीत स्वतंत्र आणखी एक रेशनिंग दुकानाची मागणी केली त्या मागणीस शासन दरबारी योग्य तो न्याय मिळाला आणि आज जंक्शनमध्ये स्वतंत्र रेशनिंग दुकानाची निर्मिती झालेली आहे.
या सर्व सेवा तळागळातील सर्वसामान्य नागरीक, मतदार केंद्रबिंदू मानून करण्यात आल्या होत्या. समाजाचं आपणही काहीतरी देणं लागतो या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आलो आणि यापुढे करीत राहणार यामध्ये कधीही खंड पडणार नाही असाही विश्र्वास संभाजी बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
माझ्यासारखे असेच अनेक मंडळी नंदकिशोर ग्रामविकास पॅनेलमध्ये आपल्या अमूल्य मताची वाट पाहत आहेत. तरी आपण तरूणांना व त्यांच्या कार्याची दखल घेत या पॅनेलला बहुमताने निवडून द्यावे अशीही विनंती बनसोडे यांनी केली आहे. निवडणूका आज आहेत उद्या नाहीत, हा कार्यक्रम दर पाच वर्षाने येणारच आहे. मात्र सामाजिक कार्यातून नागरीकांची सेवा ही अखंडित अशीच सुरू राहणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही असेही ते शेवटी म्हणाले.