इंदापूर(प्रतिनिधी): ग्रामपंचायतीप्रमाणेच सोसायटीची निवडणूक लक्षवेधी ठरत असते. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील अकोले विविध कार्यकारी सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर दणदणीत विजय मिळविला.
या विजयामुळे मा.राज्यमंत्री आमदार दत्तात्रय(मामा) भरणे यांनी नूतन संचालकांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री छत्रपती कारखान्याचे संचालक पांडुरंग(तात्या)दराडे, मा.संचालक नानासाहेब दराडे, शामराव सर्जेराव दराडे, सरपंच सोमनाथ उत्तम दराडे, भगवान कृष्णा दराडे, हरिश्चंद्र नामदेव दराडे, नामदेव ज्ञानदेव दराडे, मा.सरपंच राजेंद्र शेंडगे, अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य बबन सोलनकर, अंकुश पडळकर, देविदास कोकरे, युवराज कोकरे, योगेश दराडे, धोंडीबा दराडे, तात्या दराडे, अशोक गायकवाड, बापुराव गायकवाड, आप्पा दराडे, सुरेश दराडे यांच्यासह अकोले परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.