सिंगल इंजिन असणारे विमान कोसळले : महिला पायलट भाविका राठोड सुरक्षित

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): वैमानिक तयार करणार्‍या कार्व्हर एव्हिएशन संस्थेचे प्रशिक्षण घेत असलेल्या महिला चालक भाविका राठोड यांच्याकडून सोलो प्रशिक्षण करीत असताना सिंगल इंजिन असणारे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी नजीक कोसळले यामधील महिलेला पोंदकुले वस्तीवरील तरूणांनी सुखरूप बाहेर काढले.

या संस्थेतून विमान चालकाचा कमर्शइल व खाजगी स्वरूपाचा परवाना मिळतो. त्याचप्रमाणे विमानाची देखभाल करण्याचे प्रशिक्षण सुद्धा याठिकाणी दिले जाते. बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान कशामुळे पडले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. ही घटना समजताच शेजारील पोंकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले.

या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाची मात्र दुरावस्था झाली आहे. घटनेच्या ठिकाणी कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तातडीने जागेवर पोहचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!