अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): गोतंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी सुनिल बापू कांबळे यांची निवड झालेबद्दल इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी भरणे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोतंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, काशिनाथ अण्णा शेटे, आप्पा पाटील, शंकर भोंग, पोपट नलवडे, रवी कांबळे,अनिल खराडे, वसंत कांबळे, छगन शेंडे आबा मारकड, बापू पिसे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.