अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कामठे कन्स्ट्रक्शनच्या वतीने पालखी महामार्गावर वृक्षारोपण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आज पूर्ण देशभरात 75 पेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 9 वाजलेपासून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यातही गोतोंडी या ठिकाणी पालखी महामार्गावर कामठे कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, कामठे कन्स्ट्रक्शनचे नंदकिशोर कामठे, यश कामठे, एनएचएआय नारायणकर, महेश कामठे, प्रोजेक्ट मॅनेजर पंकज जगताप, ऐ.के.सिंग, गोतोंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक श्री.रणवरे इ. मान्यवर उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री भरणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, हा पालखी महामार्ग होण्यासाठी लोकनेते शरदचंद्रजी पवार यांनी खूप मोठ्या प्रमाणावर बैठका घेऊन हा पालखी महामार्ग होण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडून तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून येणार्या योजना या माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात निश्चितच काम करेल. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कामठे कंन्स्ट्रक्शन चे कौतुकीही केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका हा खूप नशीबवान आहे कुठलाही माणूस रस्त्याला लागला की तो राष्ट्रीय महामार्गालाच लागेल, कारण पुणे सोलापूर महामार्ग तसेच पालखी महामार्गाचे जाळे सबंध तालुक्यात पसरले आहे. रस्ता चांगला झाला म्हणून स्पीड वाढवू नका असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर हा कार्यक्रम घेतल्याबद्दल कामठे कंन्स्ट्रक्शनचे आभारही मानले.
या कार्यक्रमास दिनकर नलवडे, युवराज मस्के, आप्पा पाटील अनिल खराडे काशिनाथ शेटे, शंकर भोंग, विभीषण नलवडे, अशोक कदम, छगन शेंडे, आबा मार्कड, महेश पवार, हरिभाऊ खाडे, संजय बिबे, सुनील कांबळे, रवी कांबळे, बापू पिसे व सर्व पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.