अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येथील पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या दक्षतेमुळे तब्बल 68 लाख 23 हजार 920 रूपयांचा गुटखा व 25 लाख रूपयांचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा मिळून 93 लाख 23 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्वत्र इंदापूर पोलीसांच्या दक्षतेबाबत कौतुक होत आहे.
दि.16 जुलै 2022 रोजी इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार रात्रीच्या वेळी सरडेवाडी टोलनाक्याजवळ नाकाबंदी करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक कर्नाटक पासिंगचा ट्रक सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोल नाका येथे सापळा रुचून अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक केए-28 बी-9831 यास थांबवून संशयितरित्या तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधी गुटख्याची 178 गोण्या आढळून आल्या.
पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत करून ट्रकच्या चालक-मालका विरुद्ध अन्न व सुरक्षा अधिनियम तसेच भारतीय कलम 328 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सपोनी ज्ञानेश्वर धनवे, सपोनी महेश माने, पोसई सुधीर पाडूळे, पो.हवा. बालगुडे, पो.ना. मनोज गायकवाड, पो.ना. बापू मोहिते, पो.ना. महेंद्र पवार, पो.ना. मोहम्मदअली मडी, पो.ना. जगदीश चौधर, पो.ना. भोईटे, पो.ना.सलमान खान, पो.कॉ. सूर्यवंशी, पो. कॉ. चोरमले, पो. कॉ. राखुंडे यांनी केली.