अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): सहकार क्षेत्रात 97 व्या घटनादुरूस्तीमुळे अमूलाग्र बदल झालेला आहे. या बदलांमुळे सोसायट्यांची जबाबदारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोतंडी येथील गोतंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी सुनीलबापू कांबळे व शिवाजी तनपुरे या संचालकांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिनकर नलवडे, ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल खराडे, अशोक कदम, गोविंद बनसोडे, मल्लिकार्जुन हिंगाणे, सुनील जाधव, पापत साहेब, सतीश काशीद, विशाल कांबळे, सचिन पापत, पांडुरंग निकम, दत्तू नलवडे व सोसायटीचे संचालक मंडळ जयश्री नलवडे, चेअरमन युवराज कांबळे,अंकुश माने, संभाजी बरळ, नवनाथ नलवडे, तुकाराम भोसले, मच्छिंद्र आदलिंग, भाग्यश्री नलवडे, हनुमंत मारकड, संभाजी लोहकरे, अर्जुन शिंदे, अलका सावंत हे सर्व संचालक उपस्थित होते. या दोघांच्या निवडीमुळे सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.